उदगीर (एल पी उगीले) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीर येथील 44 विद्यार्थी व तीन शिक्षक बालाजी रोडे, सौ. मळभागे राचम्मा, सौ.शानेवार अनिता यांनी स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला शैक्षणिक सहल अंतर्गत भेट दिली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच ग्रंथालयाला भेट देत विविध प्रयोगशाळांमधील प्रात्यक्षिके पाहिली, व त्याबाबत माहिती घेतली. समन्वयक प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी केली. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साबदे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
