Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके

 



उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. 

गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला.

हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.