Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची उदगीर कार्यकारणी जाहीर.

 



उदगीर (एल पी उगीले)

 महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेनभाई रेडकर तसेच लातुर विभागाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या सुचनेनुसार उदगीर आगार कार्यकारिणी निवडीची बैठक उदगीर शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या बैठकीत उदगीर आगार कार्यकारिणी खालीलप्रमाणे निवड करण्यात आली. 

 प्रमुख सल्लागार म्हणून शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांची निवड करण्यात आली तर उदगीर 

 आगार अध्यक्ष पदी: दयानंद फड,

 आगार सचिव पदी: धनराज स्वामी, 

 कार्याध्यक्ष: संजय फड, कोषाध्यक्ष: दिलीप म्हेत्रे, उपाध्यक्ष:श्रीडोळे विनायक,पटेल के जी,सहसचिव: महेश निला,संघटक : सुनील चव्हाण,प्रसिद्धी प्रमुख: अनिल फुले,महिला संघटक: सौ. संजना शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना लातुर विभागाचे विभाग अध्यक्ष महेश पोलकर व विभाग सचिव विवेकानंद शेटे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करत एस.टी. कामगारांच्या आर्थिक प्रश्नासह सर्व प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असुन भविष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपली एकजूट दिसणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे कुडाळ, रत्नागिरी येथे होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन केले. 

तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करुण काम करत असताना येणाऱ्या अडचणी च्या वेळी कधीही हाक द्या, शिवसेना तालुकाप्रमुख तुमच्या सोबत आहे. असे आश्वासन दिले.

 यावेळी उपतालुकाप्रमुख महेश भाऊ फुले, महाराष्ट्र एसटी कामगार सेना लातुर विभागाचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश कानगुले, लातुर आगार अध्यक्ष बंकट गायकवाड , संघटक सचिव राजकुमार धनबा, जेष्ठ नेते सचिनभाऊ पटवारी, मठपती अप्पा, संतोष माळी , प्रशांत लासुरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.