उदगीर (एल. पी. उगीले) उदगीर येथील सामाजिक जाणीवा जपणाऱ्या, उच्च विद्याविभूषित ख्यातनाम समाजसेविका विधीज्ञ वर्षाताई पंकज कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्या मुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ दिले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला त्यांच्या संघटन कुशल नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल. अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
उदगीर येथील विधानसभा बूथ कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहरांमधून वर्षाताई पंकज कांबळे यांचा पक्षप्रवेश फार महत्त्वाचा आहे. असेही शशिकांत बनसोडे यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशाच्या वेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विधीज्ञ व्यंकटराव बेद्रे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमिया, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभूराव पाटील मोर्तळवाडीकर, बाळासाहेब मारलापल्ले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विधीज्ञ दिपाली औटे, मधुमती कणशेट्टे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शशिकांत बनसोडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विकास पुरुष, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे गेल्या कित्येक वर्षापासूनची विकासाची भूक भागवणारे ना. संजय बनसोडे यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजाण नागरिक सज्ज आहेत. वर्षाताई कांबळे यांच्या पक्षप्रवेशाने आम्हाला बळ मिळाले आहे. त्यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, असाही विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
