लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यामध्ये सध्या अवैद धंदे बोकाळले आहेत. त्यासोबतच पोलिसांचा जो वचक पाहिजे, तो वचकही संपत आला आहे. किंबहुना पूर्णपणे संपला आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेचे काम फार महत्त्वाचे असते. याचे गांभीर्य पोलीस प्रशासनाने घ्यावे. अशी अपेक्षा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूर शहरातील नामांकित पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन विद्यालयासमोर विक्रम नारायण पांचाळ युवकाचा खून झाल्याचे अत्यंत धक्कादायक गंभीर आणि दुर्दैवी आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण चर्चा केली असून शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा प्रकारांवर नियंत्रण आणून जिल्ह्यातील जनतेला अश्वस्त करावे, गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय वाढणार नाहीत यासाठी जनजागृती करावी. अशा सूचना त्यांना दिले आहेत. अशी माहिती समाज माध्यमावरून आ. अमित देशमुख यांनी दिली आहे.
या घटनेतील जखमी असलेले आदित्य भारत साडे, सुजल बलभीम रेड्डी, व सुशांत माणिक परांडे या तीन युवकांवर योग्य ते तातडीने उपचार करावेत. अशा सूचना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना देण्यात आल्या आहेत, या तिन्ही युवकांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे. अशी ही माहिती आ. अमित देशमुख यांनी दिली आहे.
या दुर्दैवी घटनेत मयत झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना ही कली आहे .
