उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
