उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. शंकर राठोड यांच्या हस्ते उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी निकिता मुद्देवाड, कादंबरी पवार, संभाजी अंतेवाड आणि अयोध्या पवार या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. साहित्यसंमेलनांमध्ये आपल्या दर्जेदार कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रा. डॉ. शंकर राठोड यांनी माय, माती, शेती, सत्ता, मायबोली आणि खरे प्रेम यांसारख्या विषयांवर आशयघन कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कवितांना जोरदार दाद मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी मातृभाषेचे महत्त्व, समृद्ध मराठी साहित्य आणि मायबोलीचे ऋण याबाबत विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार आणि कोषाध्यक्ष माधवराव नौबदे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना मोरे यांनी तर प्रा. डॉ. बाळासाहेब दहिफळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शिवहार फुलवळकर, प्रा. डॉ. कोंडिबा भदाडे, प्रा. डॉ. हरिदास भुईवार, प्रा. गोविंद खराबे आणि श्री. राजु बोनावळे यांचे विशेष परिश्रम लाभले. प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, प्रा. सरस्वती येडले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
