Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उदगीरच्या समाजवादी विचाराची जनता काँग्रेसच्या पाठीशी राहणार - डॉ. अंजुम कादरी

 


उदगीर (प्रतिनिधी) 

उदगीर शहरातील जनता जातीपातीच्या राजकारणाला वैतागलेली आहे. जात पात विरहित आणि सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन चालणाऱ्या सर्व मतदारांचा कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराची गती विचारात घेऊन विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उदगीर शहरात येऊन त्यांच्या परीने काही आश्वासन देण्याचा प्रयत्नही करून गेले, मात्र उदगीरची सर्वसामान्य जनता अशा भोंगळ आदर्शवादाला आणि नेहमीच्याच घोषणांना बळी पडणार नाही. कारण 2016 मध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी उदगीर जिल्हा करण्याच्या बेंबीच्या देठापासून वल्गना केल्या होत्या. मात्र इतके दिवस गेले, प्रत्यक्ष कारवाई काही झालेली नाही. याही पलीकडे जाऊन उदगीर परिसरातील सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांचे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगधंद्यांना गती यावी, म्हणून तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले यांनी प्रयत्न करून एमआयडीसीला मंजुरी मिळवली होती. मात्र त्यानंतर एमआयडीसीचे घोंगडे भिजत पडले आहे. गेले कित्येक वर्षापासून केवळ एमआयडीसीच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा कोणीही विचार करत नाही. सर्वसामान्य माणसाच्या भल्याचा विचार फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतो. त्यामुळेच काँग्रेस पक्षासोबत जनता आहे. असे विचार काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजुम कादरी यांनी व्यक्त केले आहेत. 

1970 च्या काळाच्या दरम्यान अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेल्या ॲड. अब्दुल्ला कादरी यांना उदगीरकरांनी त्यांची वैचारिक प्रगल्भता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बनवले होते. जनतेतून निवडून आलेले ते पहिले नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणला नाही. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक राजकारण काय असू शकते? हे त्यांनी दाखवून दिले. तो आदर्श आपल्या रक्तात भिंनेलेला आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. 

काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेसमोरील मैदानात राज्याचे युवा नेते तथा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना चैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्व आमदार अमितभैया विलासराव देशमुख यांची भव्य जाहीर सभा होणार आहे.

उदगीर परिसरातील जनता ही समाजवादी विचारधारेला मानणारी आहे. त्यामुळे तो विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी योगायोगाने काँग्रेस पक्षाने माझ्यावर सोपवली आहे, आणि उदगीर परिसरातील जनतेचा विश्वास सार्थ करून उदगीरचा विकास ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी घडवून आणला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन काय असते? हे मी दाखवून देऊ शकते. असा विश्वासही याप्रसंगी डॉ. अंजुम कादरी यांनी बोलून दाखवला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.