Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

२१ वर्षांपासून सतत पत्ता बदलत पोलीस गुंगारा देणारा प्रमुख आरोपी अटकेत.

 


 

लातूर (एल पी उगिले) पोलीसांच्या विशेष पथकाने २००४ सालापासून विविध ठिकाणी वास्तव्य बदलत पोलीस आणि न्यायालयास चकवा देणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक केली असून, दीर्घ काळ प्रलंबित असलेली डारमंड फाईल पुन्हा सक्रिय करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सदर आरोपीवर सशस्त्र स्वरूपात फिर्यादीला मारहाण करून दरोडा घालणे, जखमी करणे व रोकड-घड्याळाची जबरी लूट केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होता.

  याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ सप्टेंबर २००४, रात्री २०.१० वा. फिर्यादी भास्कर हरिश्चंद्र शिंदे, हे त्यांच्या लेबर कॉलनी येथील मित्राकडून परत मजगे नगरकडे येत होते. रस्ता निर्मनुष्य व  अरुंद असल्याने २५ ते ३० वयोगटातील चार  तरुणांनी तलवार, चाकू चा धाक दाखवत फिर्यादीला जीव मारण्याच्या धमक्या देत शर्टच्या वरच्या खिशातील  रोख रक्कम,मनगटी घड्याळ  जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान झटापटीत फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १९६/२००४ कलम ३९४, ३४ भारतीय दंड संहिता अन्वये तात्काळ गुन्हा नोंदविण्यात आला.

            गुन्हा दाखल होताच आरोपी बालाजी उर्फ बंटी सुधाकर पकाले हा 

सतत वास्तव्य व ओळख लपविण्या साठी वेगवेगळी नावे वापरून पोलीस समन्स, वॉरंट टाळण्यासाठी गायब राहुन न्यायालयीन कारवाईत गैरहजर राहुल यंत्रणेला दीर्घकाळ चकवा देत होता.त्यामुळे हा गुन्हा अनेक वर्षे “डारमंड फाईल” म्हणून वर्गीकृत ठेवण्यात आला होता.

 अलीकडे लातूर पोलिसांच्या विशेष पथकास विश्वसनीय माहिती मिळाली की, सदरचा आरोपी गरुड चौक रिंग रोड परिसरातील महादेव नगर भागात नाव बदलून राहत आहे. त्यावरून विशेष पथकाने तात्काळ गुप्त चौकशी करत माहिती गोळा करून वेगवेगळ्या पत्त्यावरून मिळणाऱ्या हालचालींची पडताळणी करून पथकास आरोपी तेथेच वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाल्यावर, विशेष पथकाने दि. २८/११/२०२५ रोजी आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव देण्यात आले.

आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंची सुनावणी करून न्यायालयाने आरोपीस दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक  मंगेश चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे,योगेश गायकवाड,श्रीकांत कुंभार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.