उदगीर (सुरेश बोडके)
उदगीर शहरालगत असलेल्या महार वतनी जमीन ज्याला साधारणतः हाडोळी या नावाने संबोधले जाते त्या जमिनींपैकी काही जमिनीवर राजकारणी लोकांचा डोळा असून ते राजकारणी लोक सत्ताधारी पक्षाच्या बगलेत बसलेले असल्याने महार वतनी जमिनीच्या लाभ धारकांना उदगीरचे आमदार संजय बनसोडे न्याय देतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ते राजकीय कार्यकर्ते या जमिनीवर अतिक्रमण करून कोट्यावधीची जमीन फुकटात हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि गंमत म्हणजे या प्रकरणांमध्ये उदगीर ग्रामीणचे पोलीस अधिकारी त्या लोकांना सहकार्य करत असल्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे रीतसर तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. संजय बनसोडे हे स्वतः याच समाजाचे असल्याने समाजाची त्यांना कीव येते की? आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या बगलबच्चनची ते काळजी घेतात? याकडेही आता उदगीरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. यदा कदाचित आ. संजय बनसोडे यांनी समाजाकडे पाठ फिरवून बगलबच्चांना साथ देण्याचे ठरवल्यास समाज त्यांना कधीच माफ करणार नाही.

