Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेड बांधण्यावरून चकमक! 68 वर्षीय नागरिकास मारण्याची धमकी, पोलिसात गुन्हा नोंद

 


 उदगीर (प्रतिनिधी)

उदगीर शहरातील चर्च रोड परिसरात मालकीच्या जागेवर परवानगीशिवाय शेड बांधल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन झालेल्या धक्कादायक प्रकारात तिघांनी एका 68 वर्षीय हॉटेल चालकास शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 391/2025 कलम 329(3), 352, 351(2)(3), 3(5) बी.एन.एस. अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी सय्यद अब्दुलसमद सैयद उमर हाश्मी (वय 68 वर्षे) हे हाश्मी खानावळ हॉटेलचे चालक असून, ते आझाद नगर, उदगीर येथे वास्तव्यास आहेत.

  दिनांक 08 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 4 वाजता, उदगीर शहराच्या चर्च रोड परिसरातील फिर्यादी यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत आरोपींनी विनापरवानगी शेड उभारल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. याबाबत फिर्यादींनी विरोध दर्शवून शेड का बांधले असा प्रश्न विचारला असता, आरोपी संतापले आणि त्यांनी फिर्यादींना असभ्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप फिर्यादींनी पोलिसांत नोंदवला आहे.

1. नजीर अहमद अब्दुल गफुर चौधरी,

2. अहमद नजीर शेख,

3. अजीज उर्फ मेहदी नजीर शेख,

सर्व आरोपी रा. चर्च रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर येथील रहिवासी आहेत. 

 घटनेची नोंद दिनांक 09/11/2025 रोजी दुपारी 3.59 वाजता उदगीर शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हवालदार सागर  यांनी तक्रार दाखल करून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून, गुन्ह्यात कोणताही मालमत्ता नुकसानीचा मुद्दा नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेदरम्यान वापरलेले कोणतेही वाहन वा शस्त्र नसल्याचे नमूद करण्यात आले असून, आरोपींनी मुख्यत्वे शिवीगाळ व धमकी या पद्धतीने फिर्यादींना त्रास दिला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीवर आरोपींनी परवानगीशिवाय शेड बांधणे हा अतिक्रमणाचा प्रकार असून, विरोध केल्यावर शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. फिर्यादीच्या जबाबावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.