*
*उदगीर*(प्रतिनिधी)
उदगीर येथील युवा नेते तथा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे *जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, आणि उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली *छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना भवन येथे पक्षप्रवेश केला*.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, शिवसेना उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, शहर प्रमुख बालाजी सोनाळे, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शाखाप्रमुख परशुराम विभुते, तालुका सचिव अरुण बिरादार, माजी शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, उपशाखाप्रमुख माधव शेल्हाळे, जळकोट प्रमुख सारंग आगलावे ,शंकर धोंडापुरे तालुका संघटक, पांडुरंग परीट,राहुल शिवंगे, लक्समन श्रीमंगले, वैभव कदम,सदाशिव शिवपूजे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
युवा नेते तथा उद्योगपती स्वप्नील अण्णा जाधव यांच्यासोबत सुरज जाधव, हरिबा जाधव, नारायण जाधव, संतोष आदठराव , मारुती जाधव, अमर मोरे, अमोल जोंधळे, शिवानंद सोमवंशी, बालाजी भोसले, अंगद बिरादार, दीपक भोसले, सचिन डावळे यांच्यासह स्वप्निल अण्णा जाधव युवा मंचच्या सर्व शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.
स्वप्निल अण्णा जाधव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला नवचैतन्य प्राप्त होणार आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने स्वप्निल अण्णा जाधव यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आणि महाविकास आघाडीला बळ देणारा ठरणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्वप्निल अण्णा जाधव यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केल्याबद्दल महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
