Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गजानन दळवे पाटील यांचा पुढाकार जळकोट/उदगीर :

 


जळकोट-उदगीर मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे तसेच नदीकाठच्या जमिनीतील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी भूमिपुत्र गजानन दळवे पाटील यांनी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार संजय भाऊ बनसोडे  यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या वतीने तातडीच्या मदतीची मागणी केली.गजानन दळवे पाटील यांनी आमदार साहेबांना निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या –ओला दुष्काळ जाहीर करावा.प्रत्येक शेतकऱ्यास हेक्टरी २५,००० रुपये मदत द्यावी.नदीकाठच्या शेतजमिनीतील माती वाहून गेल्यामुळे विशेष बाब म्हणून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी.या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी थेट संपर्क साधून जळकोट-उदगीर मतदारसंघातील शेतकऱ्यांना अनुदान व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या वेळी गजानन दळवे पाटील म्हणाले,अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच माझे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत द्यावी हीच आमची मागणी आहे. आमदार संजय भाऊ बनसोडे  यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत.”गजानन दळवे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन मदत मिळवून देण्याचा आपला संकल्प व्यक्त केला असून येत्या काळात शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.