उदगीर (प्रतिनिधी)
“शासन योजना सर्वांसाठी, पण लाभ काहींनाच” या वास्तवाला बदलण्या साठी राष्ट्रीय मोदी सेवा समितीने संपूर्ण भारतभर प्रचार–प्रसार अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत वृद्ध पेन्शन योजना, परित्यक्ता महिला, अपंग व्यक्ती तसेच इतर शासकीय योजनांपासून किती लोक वंचित आहेत, याचा शोध घेऊन त्यांना हक्काचे लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उदगीर तालुक्यात मोहिमेला सुरुवात
उदगीर तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रदेश संघटन महामंत्री डॉ. शरदकुमार तेलगाने, बिदर जिल्हाध्यक्ष सुरजीत आडे, उदगीर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन काळगापुरे, तालुकाध्यक्ष (शिक्षक आघाडी) महारुद्र झेरीकुंटे आणि उपाध्यक्ष कल्याणजी लाला उपस्थित होते.
मोहिमेची उद्दिष्टे
▪️वृद्ध, परित्यक्ता महिला व अपंग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे का, हे तपासणे.
▪️वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना शासन दरबारी मदत मिळवून देणे.
▪️योजनांची माहिती घरोघरी पोहोचवणे आणि जनजागृती करणे.
या वेळी बोलताना डॉ. शरदकुमार तेलगाने म्हणाले, “समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला शासनाने दिलेले हक्काचे लाभ मिळाले पाहिजेत. शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे मात्र तरीही जे कुटुंब वंचित राहिले आहेत त्यांची यादी तयार करून त्यांना योजनांशी जोडणे हे आमचे ध्येय आहे.”सुरजीत आडे यांनी सांगितले की, “ही मोहीम ही फक्त आकडेवारीसाठी नाही तर वंचितांच्या आयुष्यात खरा बदल घडविण्याचा प्रयत्न आहे.”
