उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील महात्मा फुले नगर, संजय नगर आणि गोविंद नगर या भागातील अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते तथा या परिसरातील धुरंदर राजकारणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नगर परिषदेचे माजी नियोजन व विकास सभापती निवृत्ती राव सांगवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा फुले नगर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल जाधव, उपाध्यक्ष मुकेश कांबळे, कार्याध्यक्ष प्रशांत खदगावे, सहकार्य अध्यक्ष मनोज जोगदंड, संयोजक करण अंधारे, दत्ता कांबळे, बबन सुळकेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गोविंद नगर येथील जयंती महोत्सव समितीच्या ध्वजारोहणाच्या वेळी तेथील अध्यक्ष नितेश मधुकर वाघमारे, तोरखडे व्यंकटेश विजयकुमार, गुलपुरे अमोल अशोक, राज दीपक वाघमारे, निखिल मधुकर वाघमारे, यांनी गुंजरगे गौतम परशुराम, पवन पवार, सौरभ वाघमारे, मारुती विठ्ठल सूर्यवंशी, विजय मधुकर वाघमारे, गणेश वाघमारे हे उपस्थित होते. तर संजय नगर जयंती महोत्सव समितीचे राजू वाघमारे, कुमार मोरे, संतोष वाघमारे, करण कांबळे, साहिल गुंडीले, बालाजी वाघमारे, अमोल सारोळे, विजय कोयले, ज्ञानेश्वर कांबळे, योगेश कांबळे, राहुल कांबळे, संतोष पांढरे, हर्षवर्धन सूर्यवंशी, बालाजी भंडारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक असलेले निवृत्तीराव सांगवे यांनी जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी आणि कादंबऱ्या बद्दल माहिती सांगितली. अण्णाभाऊ साठे हे कष्टकऱ्यांचे आणि कामगारांचे नेते होते. त्यांनी जवळून कष्टकऱ्यांचे दुःख पाहिले होते. त्यामुळेच गोरगरिबांचे दुःख लोकांच्या नजरेसमोर आणण्यासाठी लोकांना आवडेल अशा भाषेत मात्र परखड सत्य आपल्या कादंबरी आणि शाहिरीतून अण्णाभाऊ साठे यांनी प्रभावीपणे मांडले आहे.
"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव !" अशा शब्दात अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेबद्दल आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेबद्दलही अण्णाभाऊ साठे यांनी प्रखरपणे मते मांडली आहेत. समाजाने एकोप्याने राहावे. राजकारणी लोक आपसात गैरसमज पसरवून स्वार्थ साधत असतात. अशा राजकारणी लोकांपेक्षा समाजकारणी लोकांवर जास्त विश्वास ठेवावा. निवडणुका आल्यानंतर लोक आश्वासन देतात आणि निघून जातात. मात्र आपण याच ठिकाणी आहोत, आणि याच ठिकाणचे कायम राहणारे आहोत. त्यामुळे आपण सर्वजण एकजुटीने राहून आपला आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घेणे गरजेचे आहे, असेही निवृत्तीराव सांगवे यांनी सांगितले.
