Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन गुटखा माफिया लातूर जिल्ह्यातून हद्दपार.अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी कडक कारवाईचे निर्देश

 

   

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू हे परराज्यातून लातूर जिल्ह्यात आणले जातात, अशी माहिती पोलिसांना लागली होती. त्यावर पळत ठेवून दोन गुटका माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करून अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चालवला आहे.   

याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की,लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कारवाई करून सुद्धा अवैध धंदे सुरूच ठेवणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात येत असून पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीतील इसम राजू उर्फ शिवलिंग हामने (रा. भाग्यनगर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर),आकाश बालाजी कोटगीर (रा. हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर)

त्यांच्यावर मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीक केलेला गुटखा, पानमसाला तसेच सुपारी ची विक्री व साठा करून त्याची अवैधरित्या किरकोळ व घाऊक विक्री करण्याचे अनेक गुन्हे दाखल असून वेळोवेळी प्रतिबंध व गुन्हे दाखल करून कारवाई करूनही त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही. तसेच ते गुटखा व पानमसाला, सुपारीची लपून-छपून अवैध विक्री करीत असल्याने प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाजारामध्ये उपलब्ध होत असल्याचे वारंवार आढळून येत असल्याने त्यांच्या अशा कृत्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. गुटखा, पान मसाला खाल्ल्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळे आजार होवू शकतात. समाजातील लोकांवर, युवकांवर आरोग्य विषयक तसेच आर्थीक परिणाम होवून बेकारी वाढून समाजावर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच दंडाधिकारी यांचेकडे प्रतिबंधक कार्यवाही करुनही त्याचे वर्तनामध्ये सुधारणा होत नसुन त्यांच्या या कृत्यामुळे सार्वजनीक आरोग्य व शांतता धोक्यात येत आहे. 

              त्यामुळे नमूद इसमांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी तसेच शहरातील व परिसरातील लोकांचे स्वास्थ्य व सार्वजनिक शांतता कायम राहण्या करिता कलम ५६ (ब) म.पो.का.प्रमाणे एक वर्षाचे कालावधी करिता लातूर जिल्हयाचे हद्दीतून हद्यपार करणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद इसमा विरुद्ध हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांनी नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, अहमदपूर  डॉ. मंजुषा लटपटे यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव तयार करून हद्दपारिच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अहमदपूर अरविंद रायबोले यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे अहमदपूरचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनर व त्यांच्या टीमने  नमूद आरोपी विरुद्ध सविस्तर हद्दपारचा प्रस्तावाचा पाठपुरावा करून उपविभागीय दंडाधिकारी अहमदपूर यांचे कार्यालयात सुनावणी अंति नमूद आरोपीना मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 56 (ब) अन्वये पी लातूर जिल्हयातुन (एक) वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असून नमूद हद्दपार आरोपींनी दिनांक 22/07/2025 ते दिनांक 22/07/2026 पर्यंत लातूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. सदरचे हद्दपारचे आदेश प्राप्त होताच, अहमदपूर पोलिसांनी नमूद आरोपींना लातूर जिल्ह्याचे हद्दीबाहेर नेऊन सोडले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.