उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा येथील वामनराव पाटील यांचे चिरंजीव तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव दिलीप पाटील यांच्या सेवा पूर्ती निमित्ताने अपूर्वा मार्बल्स अँड ओम ग्रॅनाईट चे मालक रामेश्वर बिरादार जकनाळकर आणि मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करून, त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बालाजी पाटील हेही उपस्थित होते.
उदगीर कर्मभूमी असलेल्या दिलीप पाटील यांनी विद्यापीठाच्या कामकाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवून उदगीरच्या नावलौकिकात भर टाकली आहे. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.
