उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शिरूर जानापुर येथील
चंगळामाता आश्रमशाळेवरील सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले तानाजी मिरकले हे दि. ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने माऊली नगर निडेबन तर्फे दक्षिण मुखी हनुमान मंदिरात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्यामराव भडंगे व सत्कार मुर्तीं म्हणून श्री व सौ तानाजी मिरकले तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हुडे, राजेश कदम , अमरदीप देशमुख, काॅलनीचे अध्यक्ष बस्वराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम श्री व सौ तानाजी मिरकले यांचा सत्कार माऊली नगर तर्फे विचार संघावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सहशिक्षक तानाजी मिरकले यांच्या अंगी अभ्यासू, मितभाषी, समर्पण, सहकार्याची वृत्ती , सहानुभूती इ. गुण आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर त्यांनी मेहनत घेतली त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण क्षेत्र या सेवेत कार्यरत आहेत.एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, सहशिक्षक विजयकुमार दापकेकर, डॉ. गजानन टिपराळे यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त सहशिक्षक तानाजी मिरकले यांना येणारे आयुष्य सुखा समाधानाचे , निरोगी व दीर्घायुषी जावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षिय समारोपात श्यामराव भडंगे यांनी म्हटले, मिरकले सर खूप नशीबवान आहेत कारण त्यांनी यशस्वीपणे आपली सेवा पूर्व केली आहे. खूप कमी लोकांच्या भाग्यात हा दिवस असतो. त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे महान कार्य केले आहे.सेवानिवृत्त सहशिक्षक तानाजी मिरकले सत्काराला उत्तर देताना म्हणाले, माझ्या माऊली नगर तर्फे सपत्नीक सत्कार केलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हा दिवस मी जीवनभर स्मरणात ठेवतो. आपले प्रेम, सहकार्य असेच माझ्या कुटुंबावर असू द्या.सहशिक्षक तुकाराम रेनगुंटवार यांनी सेवा पूर्ती कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी काढली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सतीश मुळे यांनी केले तर आभार सहशिक्षक राजेंद्र भोळे यांनी मानले. यावेळी माऊली नगर मधील सर्वच लहान मोठे पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
