उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
