देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्याच्या वतीने ग्राम रोजगार सहायक संघटना शासन निर्णयाचे अंमलबजावणी करा देवणी ग्राम रोजगार सहायकांना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी जीआर काढून ग्राम रोजगार सहायकांना आठ हजार रुपये प्रति महिना मानधन देण्याचे व दोन हजार रुपये प्रवास भत्ता व इतर मागण्या मंजूर केल्याचा शासन निर्णय ३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढला मात्र दहा महिन्याचा प्रदीर्घ कालावधी लोटून सुद्धा सरकारने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे १५ ऑगस्ट पर्यंत शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा या विरोधात १६ आगस्ट पासून मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने दिला आहे ग्राम रोजगार सहायक संघटनेच्या शेगाव येथील तीन ऑगस्ट २०२५ रोजी सर्वसाधारण वार्षिक सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये ठराव घेण्यात आला व बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सेवक राम नाग फासे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकर नागपूर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मदन खरात लातूर जिल्ह्याचे सतीश कांबळे तसेच लातूर जिल्हा सचिव आत्माराम बिरादार येणकीकर उदगीर तालुका अध्यक्षशेखर आनंतवाड व सर्व ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते यावेळी राज्यातील सर्व जिल्हा तील जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष व देवणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील हचंनाळकर,उपाध्यक्ष राजकुमार रोटे,सचिव व ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते
