उदगीर: (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर - विभागीय क्रॉस कंट्री,10 कि. मी. धावणे (पुरुष) आणि आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री (महिला) स्पर्धा महाविद्यालय परिसरामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अ, ब, क, ड या 4 विभागातून 24 पुरुष खेळाडू तर 16 महाविद्यालयातून 58 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याचबरोबर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व पंच म्हणून 70 व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. माधव शेजुळ, निवड समिती सदस्य प्रा. डॉ. आदित्य माने, प्रा. डॉ. सचिन चामले, प्रा. डॉ. गुरुदास लोहकरे, रंजीत काकडे, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा अंतिम निकाल पुरुष गट- वैयक्तिक प्रथम- प्रतीक पवार (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड), द्वितीय- वैभव तरंगे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), तृतीय- गौरव पवार (श्री रेणुकादेवी महाविद्यालय, माहूर) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- सी झोन, द्वितीय- डी झोन, तृतीय- ए झोन याप्रमाणे यश संपादन केले. महिला गट - वैयक्तिक प्रथम- पुष्पा राठोड (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, उदगीर), द्वितीय - अंकिता गायल (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), तृतीय- वैभवी सूर्यवंशी (दयानंद कला महाविद्यालय, लातूर) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, तृतीय- ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी याप्रमाणे यश संपादन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व पंच म्हणून प्रा. डॉ. शिवानंद पाटील, प्रा. डॉ. डी.आर मुंडे, डॉ. पंडित प्रभाकर, लक्ष्मण सोनकांबळे, कु. सोनल उदबळे, वैभव अंभोरे, कल्याण पोले, वीरसागर काळे, साईनाथ कांबळे, रोहन एनाडले, प्रा. शेख रमजू, प्रताप भालेराव यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.
