Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी ओळखपत्राचे वाटप

 



उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील तिवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय परीपाठानंतर इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थांना टाय, बेल्ट व ओळख पत्र वाटप करण्यात आले.  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे हे शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच विद्यार्थाची गुणवत्ता वाढीसाठी, शाळेच्या प्रगतीसाठी नव नवीन उपक्रम  घेऊन विद्यार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी धडपडत असतात. यासाठीच शाळेतील सर्व विद्यार्थांना टाय, बेल्ट व ओळख पत्र दिले. ओळखपत्र देण्याचा उद्देश मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शालेय शिस्त व  शाळेचा विद्यार्थी ओळखण्यासाठी व सुरक्षेचा अतिरिक्त स्तर म्हणून काम करतो. विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात राहणाऱ्या आणि नसणाऱ्या व्यक्ती ओळखता येतात. शाळा एका दृष्टीक्षेपात दिसते असे सांगितले. तद्नंतर ओळख पत्र वाटप केल्यानंतरओळखपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. या वेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.