उदगीर (प्रतिनिधी)
पुणे व मुंबई येथे स्थाईक असलेल्या उदगीरकर भुमिपुत्रांनी उदयगिरी फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी महानगाव आरसनाळ येथे भरपावसात १००१ वृक्षाची लागवड करुन एक स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माजी मंत्री संजय बनसोडे यांनी उदयगिरी फाउंडेशन व शिवांजली फाउंडेशनचे कौतुक केले.
पावसाच्या धारा कोसळत असताना वृक्ष संवर्धनासाठी शेकडो हात समोर आल्याचे चित्र महानगाव आरसनाळ येथे अनेकांनी अनुभवले. १००१ वृक्षांची लागवड करीत त्यांच्या संवर्धनाचा वसा मुंबई, पुण्यात असलेल्या उदगीरच्या भुमिपुत्रांनी घेतला.
श्यामलाल विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक यांच्या पुढाकारातून मुंबई व पुणे येथे स्थाईक झालेल्या उदगीर येथील भुमिपुत्रांना एकत्रित संघटन करुन उदयगिरी फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून उदगीर परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवुन देणे, त्याच बरोबर प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होवून सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
उदयगिरी फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष चळवळ गतिमान करीत १००१ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात केला. याचाच भाग म्हणून उदगीर तालुक्यातील आरसनाळ (महानगाव) उदयगिरी फाउंडेशन व शिवांजली फाउंडेशन मुंबई व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरसनाळ पाटी पासुन रस्त्याच्या दुतर्फा व गाव शिवारातील उपलब्ध जागेवर भर पावसात १००१ वृक्षाची लागवड करुन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकला मोरे होत्या तर कार्यक्रमास राज्याचे माजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री आ. संजय बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर, कृ.उ.बा.चे माजी सभापती शिवाजीराव हुडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, उदगीर मसापचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर , उदयगीरी फाउंडेशनचे अध्यक्ष आर. पी. माने, संग्राम पटवारी, उदयगिरी फाउंडेशनचे सचिव पार्थसारथी बलसुरकर, कोषाध्यक्ष शिवराज सुर्यवंशी, राजाभाऊ पाटील, प्रदिप पुरी, जमिर परकोटे, धनाजी नरोटे, सतिश डोईजोडे, सिध्देश्वर डोंगरे, सिध्देश्वर कदम, आकाश बिरादार, डॉ. यशोदिप मोरे, ज्ञानेश्वर पाटील, राजकुमार भोसले, डॉ. अशिष बिरादार, पाटील चिघळीकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, बी.एस. माने, धनाजी मुळे, विष्णु मोरे, बाबुराव मोरे, बालाजी वरटी, दिलीप मोरे, व्यंकट पाटील, तलाठी दत्ता मोरे, ग्राम पंचायत अधिकारी संजय गुरमे, प्रताप चामले, बाबुराव होनाळे, बाळासाहेब नवाडे, शिवाजी पाटील, अमोल चक्रधर मोरे, विवेक मोरे, नारायण चामले, श्रीराम चामले, प्रकाश चामले, ज्ञानोबा मोरापल्ले, शरद मटके, माउली ग्रुपचे उपाध्यक्ष मनोहर पांचाळ, आंतरभारतीचे शिवाजी आपटे, शिवलिंग मठपती, दिपक बलसुरकर, सौ. कांता बुळळा,मुरलीधर जाधव, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, राम मोतीपवळे, व्ही. एस. कुलकर्णी आदि उपस्थित होते. प्रारंभी आरसनाळ पाटी पासुन रस्त्याच्या दुतर्फा व गाव शिवारातील उपलब्ध जागेवर भर पावसात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर येथील भुमिपुत्र पुण्या मुंबईमध्ये आपल्या कार्यातून
वेगळा ठसा उमटविला असुन उदगीरकरांची मान उंचावेल असे काम घडत आहे. उदयगिरी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले कार्य कौतुकास्पद असुन मतदार संघात समाजउपयोगी कार्य करण्यासाठी मोठा वाव आहे. वृक्ष चळवळ असो किंवा इतर कोणतेही समाजउपयोगी कार्य हाती घेवून आपल्या मातृभुमीची विकास कामाच्या माध्यमातून सेवा करावी. पुणे मुंबई येथे आर.पी. माने यांनी उदगीरकरांचे जे संघटन केलेले आहे. त्यातुन कायमस्वरुपी कार्य सुरु करावे, जे की चिरकाळ टिकेल. त्या सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी माजी सभापती प्रा. शिवाजी मुळे यांनी पुणे मुंबई येथे एकत्रितपणे येवून उदयगिरी फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याच्या करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक माजी सरपंच बालाजी बरटी आरसनाळ यांनी केले. संचलन उदयगिरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवशंकर मोरे यांनी केले तर आभार विष्णु मोरे उपाध्यक्ष शिवांजली फाउंडेशन तथा संयोजक वृक्ष लागवड यांनी मानले. या वृक्ष लागवड उपक्रमासह पुणे व मुंबई येथील उदयगिरी फाउंडेशन व शिवांजली फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. उदगीर शहर पारिसरातील विविध समाजसेवी संघटना माउली ग्रुप, जेष्ठ नागरीक संघ, मराठवाडा जनता विकास परिषद, जिव्हाळा ग्रुप, पतंजली योग समिती, आंतरभारती, रेल्वे संघर्ष समिती, पंचक्रोशितील पंढरपुर, धोतरवाडी, कुमदाळ, दावणगाव, नागराळ गावातील नागरीक तसेच या वृक्ष लागवड उपक्रमात आरसनाळ गावातील युवक, शालेय विद्यार्थी, महिला पुरुष उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
