पाटोदा (बु.)(प्रतिनिधी) येथील जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ पाटोदा बुद्रुकचे संस्थापक अध्यक्ष मानवेंद्रजी संभाजीराव केंद्रे गुरुजी यांना वंजारी समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन मेळाव्यात ठाणे येथील टीप -टॉप प्लाझा तीन हात नाका ठाणे पश्चिम येथे समस्त वंजारी समाजाच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्काराने माजी मंत्री महाराष्ट्र राज्य धनजंयजी मुंडे ,पदमश्री डॉ तात्याराव लहाने ,यांच्या शुभहस्ते व प्रा सुशिलाताई मोराळे, सुबोतरावजी भांगे, दिलीपरावजी ढोले, प्रा फुलचंद चाटे, माजी आ. संजय भाऊ दौंड, नाना करपे, राजेंद्र घुगे, विनोदजी वाघ, माधवराव नागरगोजे, हभप राधाताई सानप महाराज, धनराज गुट्टे, स्वागताध्यक्ष डॉ अमोलजी गिते आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थीतीत शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानाच्या समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जळकोट परिसरातून मानवेंद्रजी केंद्रे गुरुजी यांचे अभिनंदन होत आहे.
