अर्धापूर :- उध्दव सरोदे
अर्धापूर तालुका विधि सेवा समिती मार्फत आयोजित दिव्यांग प्रशिक्षणा साठी शहरातील महात्मा फुले निवासी दिव्यांग कर्मशाळा येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.या शिबीराची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवर मंडळींचे कर्मशाळेतर्फे स्वागत करण्यात आले.दिव्यांग्य व्यक्तींसाठी असलेले कायदे,योजना, सोईसुविधा व कायद्याने दिलेले अधिकार, नियम याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ॲड.डी. बी.दासे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषराव लोणे,सरकारी अभिव्यक्ता ॲड.विशाल परदेशी,अँड गौरव सरोदे,ॲड.शेख आमेर,ॲड.डी एम.लोणे,ॲड.अभिजीत पांडे,ॲड. ओमकार देवडे,ॲड.देवानंद फाटेकर व विजयमाला लांडगे आदि मान्यवर उपस्थितीत होते.तर यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था लोणी खुर्द ची महात्मा फुले दिव्यांग कर्मशाळा या संस्थेचे सचिव राजेश निवृत्ती लोणे,लोणी खुर्द चे उपसरपंच विजय लोणे,जनार्दन वाठोरे,महात्मा फुले निवासी दिव्यांग कर्मशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बी.के.जोगदंड,निर्देशक विजय ठाकूर, विशाल देवडे,कर्मचारी भुजंग लोणे, भास्कर खिल्लारे,प्रजापती लोणे, प्रदीप लोणे,जोगदंड केशव,बालाजी सूर्यवंशी,शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲड.गौरव सरोदे यांनी केले तर प्रास्ताविक ॲड.जी.बी. पत्रे यांनी करून आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव राजेश निवृत्तीराव लोणे यांनी मानून सदरचे कायदेविषयक शिबीर यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले.
