नांदेड :- उध्दव सरोदे -
साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नवीन मोंढा नांदेड येथे भीम आर्मी तथा आजाद समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे नांदेड जिल्हा प्रभारी मा.प्रभाकरजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन केले.यावेळी जिल्हा प्रभारी हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,जातीवादी आ.हेमंत पाटील यांनी दलितांच्या बाबतीत अर्बन अतिरेकी हा शब्द वापरून दलित समाजातील कार्यकर्ते आणि नेते हे खोटी ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करत आहेत असे त्यांनी विधानसभेमध्ये वक्तव्य केले असून ज्या हेमंत पाटलाने बहुजन,दलित, आदिवासी व वंचित घटकातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या हेमंत च्या विरोधात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जाहीरपणे निषेध नोंदवण्यात आला.या कार्यक्रमास नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक वायवळ,नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा.विनायकजी लोकरे,जिल्हा सचिव किशोर जोंधळे,जिल्हा सहसचिव गोविंद चाटसे,नितीन वाघमारे,पवन वाघमारे,रवि वाघमारे,चंदू गाडे,पिल्लू लोखंडे,संतोष लोखंडे,गंगाधर वाघमारे,शिवम वाघमारे,वाघमारे ज्ञानेश्वर वाघमारे,प्रभाकर हातागळे, शंकर बसवंत,सतीश वाघमारे,दीक्षा ताई,बेबीताई,वैशाली भालेराव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
