देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : देवणी तालुक्यातील हेळंब शिवारात बुधवारी सकाळी अज्ञात प्राण्याने शेतात बांधलेल्या पशुधनाचा चावा घेतला. त्यामुळे दोन वासरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन वासरे गंभीर जखमी झाली आहेत.सध्या शिवारात हिंस प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. रानडुक्कर, हरिण व मोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. आता शेतात बांधलेल्या पशुधनावर प्राण्यांनी हल्ला २ वासरे अज्ञात हिंस प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाली.केला आहे. बुधवारी सकाळी धनेगाव येथील एकनाथ बिरादार यांच्या दोन वासराचा हिंस्र प्राण्यांनी फडशा पाडला, तर निळकंठ पालापुरे व ईश्वर शिंदे यांची वासरे गंभीर जखमी झाली. अचानक झालेल्या हल्ल्याने पशुधनावर संकट ओढावल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी वलांडी वैद्यकीय पशुधन अधिकारी डॉ. विकास पाटील आणि वनरक्षक सूर्यकांत घोगरे यांनी भेट देऊन पाहणी केली. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे
