उदगीर(प्रतिनिधी)
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी निबंध, वक्तृत्व व वादविवाद मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी बी.एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी सादिया नदीम सय्यद तर सचिव म्हणून बी.ए.तृतीय वर्षातील विद्यार्थिनी प्रांजल संतोष स्वामी यांची निवड करण्यात आली. सादिया सय्यद यांनी मागील वर्षी युवती व्याख्यानमालेत जाहीर व्याख्यान दिले असून वक्तृत्त्व स्पर्धेचे विद्यापीठस्तरीय पारितोषिक देखील प्राप्त केले आहे.
सदरील मंडळात सदस्य म्हणून प्रिया सूर्यवंशी, वंशिका कांबळे, मुल्ला सालिया रब्बानी, साक्षी डोंगरे, स्वाती बागडी, कोमल घेरे, शुभांगी बिरादार, वैष्णवी बच्चेवार, श्रद्धा नागरगोजे, स्वराली पाटील, मयुरी बिरादार, जीवन कसबे, प्रगती गायकवाड, वैष्णवी तांबोळकर, शेख गुलनान जिलानी, शेख शबाना इस्माईल, अक्षय दुवे, निकिता काळा, वैभवी वारद, श्रद्धा गुंडिले, संस्कार मठपती, संगमेश्वर कांबळे, मयुरेश झुंगा, संजना पवार, प्रतीक्षा शिंदे, राजर्षी कोंगे, लक्ष्मीकांत यादव इत्यादी कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य व संभाषण कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व गटचर्चा इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, निबंध, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीचे प्रमुख डॉ.म.ई.तंगावार, मंडळातील सर्व सदस्य, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

