उदगीर (प्रतिनिधी) श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच नागपंचमी ज्या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतांचे पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी कालिया मर्दन केले आहे असे मानले जाते. अशा या सणाचे महत्त्व विद्यावर्धिनी शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींनी विद्यार्थ्यांना पटवून दिले व शिक्षिका महिलांनी सामूहिक रित्या सर्व शाळेतील मुलींना सोबत घेऊन भुलई खेळत हा सण साजरा केला. ज्यामध्ये अनेक पारंपरिक गीत सादर करण्यात आली. तसेच मुलींच्या फुगड्या घेण्यात आल्या. व या सणाचे महत्त्व सर्व मुलांना पटवून देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रतिनिधी श्रीमती पाटील एम व्ही तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पाटील एल बी व सौ बनसोडे एस एन यांनी पुढाकार घेतला. अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक महिला उपस्थित होत्या.
