उदगीर(प्रतिनिधी) : आपल्या नातवाने आय आय टी परीक्षेत यश मिळवून नामांकित आय टी शिक्षणसंस्थेत शिक्षण घ्यावे, हे स्वप्न स्व. प्रा. नारायण मुस्तादर यांनी पाहिले होते. त्यांचे नातू आदित्य अरुकोंड यांनी आय आय टी परीक्षेत उज्वल यश मिळवीत त्यांच स्वप्न पूर्ण केले आहे.
उदगीर येथील रहिवाशी असलेले स्व. प्रा. नारायण मुस्तादर यांनी आपला नातू आदित्य अरुकोंड याने आय टी मध्ये शिक्षण घ्यावे ही इच्छा होती. त्यादृष्टीने ते आदित्यला मार्गदर्शन ही करीत होते. मात्र अचानकपणे प्रा. नारायण मुस्तादर यांचे निधन झाले. आपल्यासाठी आपल्या आजोबानी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्यने जिद्दीने अभ्यास सुरु केला. नुकतेच आयआयटीच्या परीक्षामध्ये विशेष गुण घेऊन एयर मधे विशेष रँक घेऊन आयआयटी रूरकी, उत्तराखंड या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आहे. आदित्य याच्या या यशाचे त्याची आजी प्रा. अन्नपूर्णा मुस्तादर, आई डॉ. अश्विनी व वडील डॉ. श्रीधर अरुकोंड यांनी कौतुक केले आहे.
