उदगीर (प्रतिनिधी)
सरदार सेमी इंग्रजी विभागात नागपंचमी निमित्त शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं आशा बेंजरगे , प्रमुख पाहुणे सौं. मीरा पाटील उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागदेवतेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नागपंचमी तसेच भारतीय सणाचे शैक्षणिक सांस्कृतिक महत्त्व सौ. मीरा पाटीलने विशद केले. सौं आशा बेंजरगे म्हणाल्या श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागदेवतांची पौराणिक कथा विद्यार्थ्यांना सांगून नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. अर्चना सोलापुरेने नागदेवतेची सुंदर वेशभूषा साकारून अप्रतिम नागिन नृत्य सादर केले. सौं आशा बेंजरगे तसेच सौ मंगल वाडकरने, अर्चना सोलापुरे बाईंना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. श्रावण महिन्यातील सुंदर गीत सौं.जयश्री स्वामी ने सादर केले. नागपंचमी निमित्य माती पासून क्ले पासून नाग बनवणे इयत्ता पहिली ते चौथीचा उपक्रम घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर नागदेवतांची मूर्ती बनवून आणले होते. तसेच इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना नागदेवतेचे चित्र काढून त्यांची सुंदर माहिती लेखन करणे. हा उपक्रम घेण्यात आला.. अतिशय सुंदर नागदेवताचे चित्र काढून त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी लेखन केली होती. नागपंचमी निमित्त विद्यार्थिनींनी पारंपारिक भुलई खेळली. विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी खेळली. मेहंदी उपक्रम घेण्यात आला सौ.वृषाला जाधव, सेमी विभाग प्रमुख सौं.आशा बेंजरगे, सौ.मधुमती शिंदे यांनी सुंदर भुलई गीत सादर केले. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणात सण परंपरांना महत्व देण्यात आले असून अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतनही होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं.प्रतिभा विश्वनाथे तर आभार शिल्पा परगे मांडले. नागपंचमीच्या उत्साहात विद्यालयातील विद्यार्थिनी महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
