Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उदगीर साठी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गजानन भातलवंडे रुजू होणार

 

उदगीर (एल .पी .


उगीले) गेले कित्येक महिन्यापासून उदगीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये सतत प्रभारी अधिकारी राहत आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या बदलीनंतर पूर्णवेळ कोणीही उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले नाही. त्या ऐवजी सतत अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे प्रभार दिला जात होता. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे आता उदगीर साठी पूर्णवेळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लातूर येथील उपविभागीय अधिकारी मुख्यालयी असलेले, तसेच ज्यांनी लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अत्यंत उत्कृष्टपणे हाताळली होती, आणि ज्यांना संपूर्ण लातूर जिल्ह्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ज्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. अशा पद्धतीचा मनमिळाऊ पोलीस अधिकारी उदगीर विभागाला मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.