देवणी /लक्ष्मण रणदिवे
मानवी हक्क अभियान ही दलित शोषित कष्टकरी कामगार यांच्या कल्याणासाठी वआधिकारासाठी सनदशीर मार्गाने कार्य करणारी संघटना असुन या संघटनेने कार्यकर्ते,दलित शोषितांच्या व शेतकरी भुमिहीन शेतमजुर यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जोरदार प्रयत्न चालविले असुन पुर्ण महाराष्ट्र भर या संघटनेचे जनकल्याण कार्य सुरू ठेवले आहे, त्या प्रमाणे लातुर जिल्हात ही या संघटनेचा प्रभाव वाढतं असुन लातूर जिल्ह्यात गायरान जमीनीचे प्रश्न,बेघर लोकांचे प्रश्न,शासकीय भूखंडावरील निवासी अतिक्रमणे कायम करणे,इत्यादी मुख्य प्रश्नावर काम चालू आहे अभियानाने लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ तालुक्यातल्या पांढरवाडी गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर घेतले असुन एक वर्षापूर्वी येथील भुमिहीन मजुर स्मशानभूमीच्या व्यवस्थेपासुन वंचित होते,मात्र त्यांनी आभियांनाच्या कायदेशीर मदतीमुळे कायदेशीर संघर्ष करुन त्यांनी तहसिलदारांनी दाखवलेली स्मशानभूमीसाठीची जागा अधिकारात घेतली आहे, मात्र ती जागा आडणीच्या ठिकाणी असुन बांधकाम करुन घेतल्याशिवाय त्याचा योग्य उपयोग करणे अडचणीचे ठरतं आहे,म्हणुन त्या भुमीवर बांधकाम करुन सुव्यवस्था निर्माण करावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाचे शिरुर आनंतपाळ तालुका अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे,त्यांच्या या मागणीला शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष नितेश झांबरे,भीम शक्ती संघटनेचे प्रकाश भाऊ बनसोडे,शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी हनमंत चामले,तसेच राम वाळवाड, तुकाराम कोंडे, इत्यादींनी समर्थन केले असून,मानवी हक्क अभियानाच्या हस्तक्षेपामुळे सदरचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे,सदरचे निवेदन मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले व जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आले आहे.
