उदगीर [ प्रतिनिधी ] उदगीर शहरात साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चित्रकला स्पर्धेचे आयाजोनमहाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सीलालदादा कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अणकल्ले, अजित दादा कांबळे,आदी उपस्थित होते . उदगीर शहरातील १५ शाळेतील ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्य संयोजक जवाहर कांबळे, कार्याध्यक्ष रविंद्र बेद्रे, सचिव अरविंद शिंदे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप जोंधळे, कोषाध्यक्ष संतोष बडगे, देवेंन टाकळकर, कलाशिक्षक अरविंद सूर्यवंशी, संजय महापुरे आदीनी परिश्रम घेतले .प
