,
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती अनुषंगाने येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कट्टेकर होते. याप्रसंगी तहसीलदार सोमनाथ वाडकर, पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे, व-राडे पोलीस उपनिरीक्षक देवणी ,उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला आवर्जून बैठकीस मार्केट कमिटीचे सभापती सदाशिव पाटील तळेगावकर, माजी सरपंच राम भंडारे, वसंत बिबिनवरे उपेक्षितांचे नेते, उद्धव शिंदे लहुजी शक्ती सेना लातूर जिल्हा कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, रवी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, अनिल कांबळे,रंगराव कांबळे मेजर चवनहिप्परगा, पत्रकार बालाजी टाळीकोटे,विलास वाघमारे, लक्ष्मण रणदिवे, रवी मोतीरावे लहुजी शक्ती सेनेचे देवणी ता,उपाध्यक्ष, अजय कांबळे, अविनाश कांबळे, विजय सावंत, सिकंदर हानमंते, तुकाराम पाटील देवणी पोलीस पाटील, फारुक सय्यद, लामतुरे, गुणाले, कट्टेवार, केंद्रे असे पोलीस अमलदार, यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील, जयंती मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत मोठेराव यांनी केले आहे,
