उदगीर (प्रतिनिधी) शिवाजी महाविद्यालयातील साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे,तसेच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईचे सदस्य प्रा.डॉ.नरसिंग कदम यांचा पालम येथे नुकताच सत्कार करण्यात आला. राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविलेले, शून्यातून विश्वाची निर्मिती केलेले व्यक्तिमत्त्व मा.प्रकाशराव शिरसकर, प्रसिद्ध उद्योजक मनमिळावू, उदारमतवादी विचाराचे व्यक्तिमत्व सुरेशराव चव्हाण आणि प्रत्येक सुखदुःखाच्या वाटेकरी असणाऱ्या, सर्व प्रश्नांना संयमाने व आत्मविश्वासाने हाताळणाऱ्या सौ. संगीता चव्हाण यांनी कदम यांनी केलेल्या साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल यथोचित सत्कार केला. यावेळी पत्रकार अंबादास आलमखाने यांच्या पत्रकारितेतील व सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. आजपर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी सामाजिक व बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था लातूरचा उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार,शकुंतलाबाई कलुरकर चॅरिटेबल ट्रस्ट कल्लूर सामाजिक कार्याबद्दल, चला कवितेच्या बनात उपक्रमशील पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूरचा पुरस्कार, काव्य मित्र सेवाभावी संस्था पुणे चा डॉ.ना.य.डोळे उत्कृष्ट पुरस्कार, बनवस भूषण पुरस्कार,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार,रंगकर्मी साहित्य प्रतिष्ठान उदगीरचा विशेष काव्य गौरव पुरस्कार,गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कवळखेड यांचा गुरुवर्य पुरस्कार, समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोली यांचा राष्ट्रीय संत नामदेव काव्य पुरस्कार, देवता सोनार एकता संघ पुणे व संत नरहरी सोनार सेवाभावी संस्था उदगीरचा शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार,समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोली चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकसेवा मंडळ ऑल इंडिया नागपूर चा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार, मसाप शाखा उल्हासनगर व कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद डोंबिवली यांचा राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार, सर्वद फाउंडेशन मुंबईचा सर्वद स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार,जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार,शिवाजी महाविद्यालयाच्या किसान वार्षिकांकास स्वारातीम विद्यापीठ नांदेड चा पुरस्कार(कार्यकारी संपादक) आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉ कदम यांनी रक्तदान शिबिर,रक्तगट तपासणी शिबीर,पल्स पोलिओ अभियान,ग्रामस्वच्छता अभियान,बोर पुनर्भरण, शोषखड्डे,डेंगू,मलेरिया, हत्तीरोग,वैज्ञानिक जाणीव जागृती, कुटुंबनियोजन,सर्व रोग निदान, नेत्र तपासणी सर्पप्रदर्शन,आपत्कालीन व्यवस्थापन शिबिर अशा विविध शिबिरांचे आयोजन व समाज प्रबोधनपर रॅलीचे आयोजन केलेले आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी मदत फेरी,तसेच सांगली सातारा कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदर फेरीचे आयोजन करून त्यांना मदत पुरवली आहे. त्यांचे अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय नियतकालिका मध्ये 70 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. विविध वर्तमानपत्रातून त्यांचे 60 पेक्षा जास्त लेख प्रकाशित झालेले आहेत. पीएचडीचे ते संशोधन मार्गदर्शक आहेत. विविध समित्यावर ते कार्य करत आहेत.यावेळी अप्पासाहेब कदम ,सौ.गोदावरी कदम यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिरसकर यांनी तर आभार सौ.संगीता चव्हाण यांनी मानले.
