उदगीर( प्रतिनिधी ) लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात श्रावण मासातील पहिला सण नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिया बुधे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,किरण नेमट, प्रमुख पाहुणे प्रिया फुले अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे, विज्ञान मंडळ प्रमुख शिरीष देशमुख या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे विद्यार्थिनी प्रिया फुले हिने नागपंचमीचे पौराणिक व वैज्ञानिक महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात सुप्रिया बुधे यांनी भारतीय सण उत्सव परंपरा याविषयीचे महत्त्व सांगून नागदेवतेची पूजा का केली जाते, याविषयीची पौराणिक कथा सांगितली. साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो, सापाचे रक्षण केले पाहिजे. असा वैज्ञानिक दृष्टिकोनही मुलांमध्ये रुजवला.
नागपंचमी या सणानिमित्त भुलई गीत व भुलई खेळण्यात आली, सर्व मुलींनी व महिला शिक्षकांनी या सणाचा आनंद घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा कोले प्रास्ताविक सृष्टी व्यंजने स्वागत व परिचय आदिती द्वासे नागपंचमी गीत साक्षी बिरादार वैष्णवी जोशी यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक कार्यक्रम प्रमुख बर्दापूरकर रागिणी यांनी परिश्रम घेतले. वैष्णवी जोशी या विद्यार्थिनींनी कल्याण मंत्र घेतला.
