उदगीर (प्रतिनिधी)
पुणे येथे पार पडलेल्या कौशिका असेम्ब्लीमध्ये उदगीर इनरव्हील क्लबला हॅपी स्कुल, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी,मोटीव्हेशनल प्रेसिडेंट, बेस्ट प्रेसिडेंट मानसी चन्नावार,बेस्ट सेक्रेटरी पल्लवी मुक्कावार , बेस्ट प्रेसिडेंट सेक्रेटरी जोडी मानसी -पल्लवी,बेस्ट आय एस ओ प्रिया नारखेडे,बेस्ट एडिटर अलका येरोळकर अशी आणि अजून अनेक पुरस्काराने डिसी शोभना पालेकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.उदगीर इनरव्हील क्लबसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .या कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष सौ मानसी चन्नावार, नव नियुक्त अध्यक्ष व माजी सचिव पल्लवी मुक्कावार ,नव नियुक्त सचिव योजना चौधरी,सह सचिव प्रिया नारखेडे,आय एस ओ रोहिणी चाटे, चार्टर प्रेसिडेंट व सीसी मीरा चंबुले यांनी सहभाग घेतला.
