उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे होते. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले , भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांनी हिरीरीने सहभाग घेतला. 1885 ते 1920 च्या काळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहिल्या पर्वाचे नेतृत्व केले. इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी संघर्ष केला म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. असे प्रतिपादन यावेळी केले.तसेच त्यांनी मराठा व केसरी ही दोन वृत्तपत्रे चालविली. त्यातून त्यांनी भारतीय सामाजिक व राजकीय प्रश्नांवर प्रकाश टाकला .गीतारहस्य हा ग्रंथ लिहून गीतेचे महत्व समाजात मांडले. हे त्यांचे कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे होते. ते लोकसेवक, शिक्षक, वकील, समाज सुधारक आणि राजकीय नेते म्हणून संबंध भारतीय समाजाला सुपरिचीत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ.डी.बी.मुळे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रबंधक बी.के.पाटील, अधिकक्ष व्ही.डी. गुरनाळे, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
