देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने सहकार मंत्री आ. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, शिक्षक आ. विक्रम काळे, जिल्हा अध्यक्ष डॉ. अफसर शेख आणि युवा नेतृत्व गजानन भोपणीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या लातुर जिल्हा सरचिटणीस पदी प्रताप कोयले यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष महेश गंगाधर बिरादार आणि जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र धुमाळ यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार येणाऱ्या काळात युवकांच्या विकासात व पक्ष संघटना मजबूतीने उभी करावे. या निवडी बद्दल देवणी नगर पंचायतीचे सदस्य अनिल इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ अनिल कांबळे, मनोज कन्नाडे, तालुका अध्यक्ष महेश जाधव, लक्ष्मण रणदिवे,प्राचार्य नवनाथ खुळे, बोरोळ गावचे उपसरपंच प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योग पती दत्ता हुरुचनाळे, प्रा राहुल बालुरे आणि लक्ष्मण डोणगावे सह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. आहे,
