Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषिदूत शेतीचे तंत्रज्ञान पोहोचवणार बांधा पर्यंत

    


   उदगीर (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी (परभणी) संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बि. ए.स्सी (मानद) कृषि पदवीच्या  सातव्या सत्रातील  विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम उपक्रम  ग्रामीण कृषि  जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता "वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत  उदगीर तालुक्यातील  देवर्जन या गावामध्ये  कृषी दुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले. गावामध्ये ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले . कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषिदूतानी खरीप हंगामासाठी पूर्वशेतीची मशागत व बी बियाण्याची निवड व प्रक्रिया या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले . कृषिदूत पुढील सहा महिने गावामध्ये राहणार असून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती जसे की माती-पाणी परीक्षण , किड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन , जनावरांचे संगोपन आणि शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषीदूतांकडून करण्यात येणार आहे . त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतीत येणाऱ्या समस्या आणि उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

                यांमध्ये माळी प्रणव , लोंढे ओमकार , मदनुरे लक्ष्मण , महाजन यशराज, मोदी संगमेश्वर , म्हेत्रे अभिषेक , म्हेत्रे कृष्णा, मनुरे ज्ञानेश्वर ,  हे विद्यार्थी देवर्जन गावात पुढील दहा आठवडे पदवी अभ्यासक्रमात घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी देवर्जन गावच्या सरपंच  अभिजीत साकोळकर, , कृषी साहाय्यक सुजाता बनशेलकीकर, ग्रामपंचायत सदस्य , तसेच गावातील प्रगतशील शेतकरी विरभद्र धोतरे, , महेश साकोळकर , कमलाकर पाटील, बाळासाहेब पाटील , अमोल लवठे, शिवाजी लवठे इ.शेतकरी उपस्थित होते. 

               कार्यक्रम  समन्वयक डॉ. एस. एन वानोळे, महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप प्राचार्य डॉ.ए.एम पाटील,कार्यक्रम अधिकारी एस. आर. खंडागळे याच्या  मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.