उदगीर (प्रतिनिधी) लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने 20 जुलै 2025 रोजी उदगीर येथील कार्यालयात लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली 28 सप्टेबर 2025 रोजी होणा-या वीरशैव लिंगायत वधूवर मेळाव्या निमीत्त बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रा सुदर्शनराव बिरादार व वधुवर मेळावा मार्गदर्शक शि भ प . शिवराज नावंदे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.व लक्ष्मण भालके (फुलारी)यांची लिंगायत महासंघाच्या उदगीर शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.तसेच सुर्यकांत सिरसे यांची वधुवर मेळावा स्मरणिका समिती अध्यक्ष पदी तर यशवंत पटवारी यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली.यावेळी लिंगायत महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके,शिरीष रोडगे,बापुराव शेटकार, अशोक कडोळे,संगशेट्टी बिरादार, शिवाजी शिराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
