उदगीर (एल.पी.उगीले)
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मराठी वाड्.मय मंडळाची स्थापना
करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्षस्थानी एम.ए.प्रथम वर्षातील मराठी विषयाचा विद्यार्थी रोहित हळसपुरे तर सचिवपदी बी.ए. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी शुभांगी बिरादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या मंडळात सदस्य म्हणून विक्रम कऱ्हाड, ज्ञानेश्वर भिकनुरे, भाऊसाहेब जाधव, नीलम कांबळे, ऋतुजा येवरे, कल्याणी मुळे, संध्या शिंदे, श्रद्धा नागरगगोजे,श्रद्धा मजगे, वैष्णवी पांचाळ, गायत्री बिरादार, नेहा होळकर, मुक्ता बिरादार, सुरज पिंपळे, स्वराली पाटील, स्नेहा वट्टमवार, साधना गायकवाड इत्यादी विद्यार्थी कार्यरत राहतील.
मंडळाच्या वतीने भीतीपत्रकाचे विमोचन, मराठी भाषा गौरव दिन, अभिजात मराठी भाषा दिन व मराठी भाषा पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सृर्जनशीलतेला व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने सदरील मंडळाची निर्मिती दरवर्षी करण्यात येते.
मराठी वाड्.मय मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, विभागप्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ.म.ई.तंगावार, डॉ.वर्षा निरगुडे, डॉ.के.के.मुळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.

