उदगीर (प्रतिनिधी) तब्बल २३ वर्षानंतर येथील संग्राम स्मारक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व त्यांच्या शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला. तत्कालीन विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा
दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंगद हक्के होते.
व्यासपीठावर शिक्षक सी.व्ही. संगमे, के.व्ही. कल्पे, व्ही. एन. बिरादार, एस. जी. काळे,म.ह.कुंभार, डी. डी. मठपती,मंगला शेट्टे-बिरादार, उ.ब.धरणे, बा.व्ही.बिरादार,
सोलापूरे ताई आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड.सचिन हुडगे यांनी केले. याप्रसंगी महेश आंबेसंगे, बालाजी मोतेवाड, ज्योती जिरोबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमोद हुडगे, सचिन हुडगे, किशोर लव्हराळे, संतोष बरदाळे, जगदीश बिरादार, संदीप ममदापुरे, जगदीश चिल्लरगे, सुशील पेन्सलवार, रवी कड्डे, शरद पाटील, मिलिंद मादळे, अमोल शृंगारे,सारिका द्वासे-हरकरे, मनीषा मोदी, मोहिनी इनामदार यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन बालाजी घुले व प्रेमलता नादरगे यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी सताळकर-देवर्जनकर यांनी केले.
