Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 19 ग्राम सोन्याच्या दागिन्यासह अटक.

 



   लातूर (ॲड.एल.पी.उगिले) लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरातून रात्रीच्या वेळी घरफोड्या करून लुटणारे आरोपी आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सापळ्यात अडकल्याशिवाय राहणार नाही. या परिसरातील दोन गुन्हे उघडकिस आणत आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 19 ग्रॅम सोन्याच्या दागिनेसह घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केले आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघड झाले आहेत. इतरही अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्याची आशा पोलिसांना आहे.            याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसा पासून मुरुड मधील घराचे रात्रीच्या वेळी कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

              पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

             सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला रात्रीच्या वेळी कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 19 जून रोजी पथकाने लातूर मधील पाच नंबर चौक परिसरातून एकाला ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव लक्ष्मण अशोक पवार,(वय 25 वर्ष, राहणार भोसा तालुका जिल्हा लातूर) असे असल्याचे सांगितले. 

त्याच्या ताब्यातून त्याने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घराचे कडीकोंडे तोडून,घरामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचे कबूल करून त्याने त्याच्या इतर साथीदारा सह चोरी करून त्याचे हिश्याला आलेले 19 ग्रॅम सोने नमूद आरोपी कडून हस्तगत करण्यात आले आहे. Ok पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील चोरीचे दोन गुन्हे उघडकिस आले आहेत. नमूद आरोपीने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता मुरुड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

                   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, राजेश कंचे, गणेश साठे,गोविंद भोसले,श्रीनिवास जांभळे केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.