Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

' शेतकरी भवन' उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देवु: आ. बनसोडे

 

     उदगीर (एल .पी .उगीले) जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी विजेअभावी खुप अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन त्या त्या भागात मोठे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले असुन  माझ्या शेतकऱ्यांना दिवसा विज उपलब्ध व्हावी, म्हणून मतदार संघात अनेक सौरउर्जेचे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली.

ते उदगीर शहरातील आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन व सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित परुचा कार्यक्रम व सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी  माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, प्रा. शाम डावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, उद्योजक सागर महाजन, शिवकुमार गुळंगे, कल्पेश बाहेती, जगदीश बाहेती, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, रामदास बेंबडे, अनिल मुदाळे, अनिरुद्द गुरुडे,श्रीधर बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार येनकीकर, शिवशंकर बिरादार, सुनिल केंद्रे, साईनाथ कल्याणे, बालाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शांतवीर मुळे, नागेश आंबेगावे, कुणाल बागबंदे, अंकुश ताटपल्ले, मारुती कडेवर, विजय होनराव, प्रमोद पाटील, संघशक्ती बलांडे, बापू सोळुंके, पी.पी.पाटील, भरत दंडिमे, उत्तम भालेराव आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, लिंगायत भवन बांधकाम, बुद्ध विहार, छत्रपती शिवाजी महाराज भवन, शादी खाना, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  सभागृह,बस स्थानक,विविध महापुरुषांचे पुतळे व सुशोभीकरण, पाणीपुरवठ्याची योजना, पानंद रस्ते, सी.सी. रोड आदींसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देऊन या तालुक्याचा विकास केला असून हा विकास थांबु देणार नाही.

आपल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभारणार असुन त्यासाठी ५ कोटी रु निधी उपलब्ध करुन देवु. मी सदैव शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडावी म्हणून तिरु बॅरेजेसची निर्मिती केली. येथील हमाल बांधवांसाठी योजना आणणार आहे. मतदार संघात अनेक सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरु केले आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी आडत व्यापारी, कामगार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.