उदगीर (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे एकेरी नाव घेतल्याबद्दल आ. संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून व नारेबाजी करत त्यांचा, शिवा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर यांना देण्यात आले .यात मंत्री संजय शिरसाठ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. महापुरुषाचे एकेरी नाव घेऊन अवमान केले आहे.त्यांच्यात महामानव व महापुरुषाबद्दल आदर दिसून येत नाही .संबंधित ऑफिस द्वारे हे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी.असे निवेदनाद्वारे अखिल भारतीय विरशैव लिंगायत शिवा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे .यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता खंकरे, माजी अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूरे, जिल्हा अध्यक्ष ॲड. विलास खिंडे, जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ बिरादार, तालुका अध्यक्ष शिवकांत मुळे,जिल्हा प्रवक्ते लातूर सुभाष अण्णा बिरादार, रामेश्वर कदम ,सरपंच पिंपरी शिवशंकर पांडे, सोमेश्वर पटवारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
