उदगीर (प्रतिनिधी)
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषा ताई कुलकर्णी या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून शिक्षिका सौ.मळभागे आचार्यां या होत्या.अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांच्या हस्ते नागदेवतेचे पूजन करण्यात आले, व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. तसेच अध्यक्षांचा सत्कार पहिली वर्गातील प्रतिनिधी श्रावणी एकुरगेकर तसेच प्रमुख वक्त्याचं स्वागत आठवी वर्गातील प्रतिनिधी तक्षशिला चौधरी या विद्यार्थ्यांनी केले. श्रावण मास आरंभीचे गीत श्रावण आला, श्रावण आला दत्तात्रय संकलवाड यांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी बोलत असताना नागपंचमीचे महत्त्व सांगण्यात आले. बहिण भावाबद्दल छानशी बोधकथा सांगितली. नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नाग देवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.
या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत. त्यानंतर धोंड अनुराधा आचार्यांनी छंद माहेराचा बाई छंद माहेराचा हे गीत सुंदर अशा आवाजात म्हणून दाखवले .अध्यक्षीय समारोप प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी यांनी मुलांना सांगत असताना नागदेवता कुणाचं वाहन आहे किंवा नागदेवताला का पूजन केलं जातं नागपंचमीचे महत्त्व अतिशय छान पद्धतीने मुलांना समजेल अशा भाषेमध्ये सांगण्यात आले तसेच आजचे वक्ते माळभागे आचार्यांनी भावासाठी धावा करते असे सुंदर असे गीत सादर केल. सर्व मुलांचे लाडके व प्रिय असणारे प्रशालेचे मुख्याध्यापका यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांनी वाढदिवसानिमित्त मुलांना पेन्सिल बक्षीस दिले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच सर्व शिक्षकांनी कांबळे आचार्यां , सौ.शानेवार आचार्यां, श्री संकलवाड आचार्य, श्री पटवारी आचार्य, सौ. मळभागे आचार्यां, श्री रोहित पाटील आचार्य, श्री रोडे आचार्य, सौ धोंड आचार्यां , श्री प्रशांत पाटील आचार्य,सौ. शितल कांबळे आचार्यां बालवाडी प्रमुख सौ.दुम्पलवार आचार्यां , माया कांबळे आचार्यां व शाळेचे आधारस्तंभ श्री दिलीप बिरादार आचार्य या सर्वांनी अनमोल असे सहकार्य करून हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री दत्तात्रय संकलवाड आचार्य यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार सौ.शानेवार आचार्यां यांनी मानले अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीत पार पडला
