उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व उमा चौक सह शहरातील प्रमुख चौकात रस्ते खड्डेमय झाले आहेत. या ठिकाणी दिवसेंदिवस खड्डयाचे साम्राज्य वाढत चालले आहे. सदर ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, रस्त्यात खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ता आहे? हे समजत नाही. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे. याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. गांधीगिरी पद्धतीने दिनांक 29 जुलै 2025 रोजी मनसेचा कार्यकर्त्यांनी संबंधित चौकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलनात्मक मार्गाने निषेध नोंदवला आहे. तरी त्वरित रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर शहर या विरोधात तीव्र आंदोलन हाती घेऊन मनसे स्टाईल खळखटक पद्धतीने काम करेल याची नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष संतोष भोपळे ,शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक, विगाभाध्यक्ष विनोद चव्हाण, मनविसे रोहित बोईनवाड, ओमकार बिरादार,अभय यमलवाड,प्रेम गगनबोने, जितु चव्हाण, रोहित वडले, वैभव सांगवीकर यादी पदाधिकारी सहभागी होते.
