Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल - रामहरी रुपनवर

 



पुणे (प्रतिनिधी)

          अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.

  ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या वतीने सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे अहिल्यादेवी होळकर यांच्यात्रि  शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान  ९० महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोककल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही युद्ध टाळून शांतता कायम ठेवली राज्यसमृद्ध झाले पाहिजे अशी ही कर्तृत्ववान महिला यांनी महिला सक्षमीकरण धार्मिक विचार रोजगार निर्मिती सतत लोकहितेचा विचार करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. महिलांना साक्षर करण्यासाठी अथक प्रयत्न जगातील सर्वात मोठी महिलांची फौज उभी करणारी स्त्री म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय! प्राणी पक्षी यांची काळजी,अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली. नेतृत्व गुण व ज्ञानलालसा मुत्सद्दीपणा व झुंज घेण्याचा खंबीरपणा अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे होता.   अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने कराड येथे १४६ महिलांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार ने सन्मानित केले व पुणे येथे ९० महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिलांचा गौरव करणारी एकमेव अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांचे कार्यकर्तुकास्पद आहे असे रामहरी रुपनवर साहेब यांनी केले.    याप्रसंगी डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे डॉ प्रा महेश थोरवे संचालक एमआयटी इन्स्टिट्यूशन पुणे बाळासाहेब कर्णवर पाटील  चेअरमन श्री सद्गुरु साखर कारखाना दीपक राहीज, उद्योगपती महेश इनामदार, रिजन हेड्स सॅटर्डे क्लब ट्रस्ट पुणे यांची भाषणे झाली . प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व सुनील शेंडगे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ बाळासाहेब झोरे, राजू दुर्गे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड अशोकराव पवार, ज्येष्ठ समाजसेवक मुंबई शेषराव शेंडगे, चेअरमन स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था कोल्हापूर मुकुंद कुचेकर, ज्येष्ठ समाजसेवक पिंपरी चिंचवड.   याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले व आभार प्रा महावीर काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा शितल काकडे, नथुराम डोईफोडे, राजगड बाबुराव, शेडगे मावळ, सुनील शेंडगे, पुणे दिनेश शिंदे, भोर वसंतराव हिरवे बारामती, अशोकराव शिंदे विश्रांतवाडी, हरिभाऊ लबडे भोसरी, इंद्रजित ताटे, अजित ताटे, वारजे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी एमडी दडस, संजय नायकवडी, संजय कवितके, सोमनाथ देवकाते, शंकर दाते, संतोष पांढरे, अरुणा गडस, भाऊसाहेब आखाडे, नानासाहेब मरगळे, तुकाराम कोकरे, नवल राजकाळे, सोमनाथ ओव्हाळ, संदीप शेंडगे, प्रशांत शेंडगे इत्यादी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.